पंढरपूर नागरी सहकारी पतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस 1लाख 25 हजारांची मदत

पंढरपूर – ईगल आय मीडिया

सध्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशभर नवीन संकट ओढवले आहे. त्यामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून.  त्याचा मोठा ताण केंद्र, व राज्यसरकार वर आला आहे. त्यातून सावरण्यासाठी सुरु आसलेल्या विविध उपाययोजनाना मदत म्हणून  पंढरपुर नागरी सहकारी पातसंस्थेकडून ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून 1 लाख 25 हजारांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी करण्यात आली आहे. त्या रकमेचा धनादेश सहाय्यक निबंधक एस एम तांदळे यांचायकडे सुपूर्द करण्यात आला.

                    पंढरपूर नागरी सहकारी पातसंस्थेच्या  संचालक मंडळाने 1 लाख 25 हजाराची मदत कोरोनाग्रस्थासाठी करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा धनादेश  सहाय्यक निबंधक एस एम तांदळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. शिवाय सहाय्यक निबंधक पंढरपूर यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील गरजू कोरोना ग्रस्तांना अन्नधान्य वाटप करणे, सॅनिटरी, मास्क चे वाटप करणे या शिवाय आरोग्य सेवक, पोलीस यांना ही आवश्यक ती मदत करण्यात येत आहे. पंढरपूर नागरी सहकारी पातसंस्थे कडून लॉकडाऊन काळात खातेदारांची गैरसोय होऊ नये यासाठी मागणीनुसार घरपोच पैसे देण्याची  सुविधा सूरु केली आहे.या  शिवाय यापूर्वी ही सामाजिक बांधिलकी जोपासत  पूरग्रस्त, गरजू विध्यार्थी, आषाडी यात्रा कालावधीत वारकर्यांना मदत केली आहे.

          यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड पांडुरंग नाईकनवरे, उपाध्यक्ष डॉ दत्तात्रय साळुंखे, संचालक दत्ता मोरे, अनिल कारंडे, मोहन कोळी, ऍड संतोष नाईकनवरे, जेष्ठ संचालक सुधाकर कवडे, सिद्धेश्वर उपासे, सचिव मोहन डावरे, अजय जवारे, राजू साळवे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!