पुणे : ईगल आय मीडिया
बुधवार ( दि 29 एप्रिल ) रोजी एका दिवसात पुणे, पिंपरी आणि परिसरात तब्बल १०४ नवीण कोरोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. यामुळे पुणे परिसरातील कोरोग्रस्त रुग्णांची संख्या १५९५ झाली आहे. तर दिवसभरात तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची एकूण संख्या ९० झाली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून बुधवारी रात्री याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरात ९३, पिंपरी चिंचवडमध्ये सात आणि पुणे ग्रामीणमध्ये एका नव्या रुग्णाची भर पडली आहे. पुणे छावणी परिसरात बुधवारी तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ६५ वर्षीय महिलेचा तर पुण्यात ६५ आणि ७१ वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरातून बुधवारी २७ रुग्णांना घरी सोडण्यात आले, त्यामुळे घरी परतलेल्या रुग्णांची संख्या २३० झाली आहे. पिंपरी चिंचवडमधून ३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
नगरसेविकेसह पतीला संसर्ग
शहरातील एका नगरसेविकेला आणि तिच्या पतीला करोना विषाणू संसर्गाची लागण झाल्याचे बुधवारी निदर्शनास आले आहे. प्रशासनाकडून याबाबत माहिती देण्यात आली असून संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.
