भीमा – नीरा खोऱ्यात पाऊस, धरणांच्या पाणी पातळीत होतेय वाढ !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

भीमा व नीरा नद्यांच्या खोऱ्यात गेल्या दोन दिवसात दमदार पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीपातळीत पातळीत वाढ होत आहे. सध्या वीर धरणात २७ टक्के तर भाटघर धरणात २३ टक्के पाणीसाठा आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी दमदार पाऊस झाला. यामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
धरण क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आहे. पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना उजनी तसेच नीरा उजवा कालवा तसेच भीमा नदीतून पाणी मिळते. नीरा उजवा कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील विविध गावात फायदा होतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात तसेच त्यानंतर झालेल्या दमदार पावसामुळे पंढरपूर तालुका ऊस लागवड, बाजरी, ज्वारी, सोयाबीन पेरणी वेगात सुरू आहे. सध्या पंढरपूर तालुक्यात पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष हे भीमा, नीरा नदी खोऱ्यात पडणाऱ्या पावसाकडे आहे. उजनी धरणातील पाणीपातळी वाढू लागली आहे. नीरा उजवा कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील उपयुक्त असणाऱ्या तिसंगी तलावात पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे तलावातही ५५ टक्के हून अधिक पाणीसाठा आला आहे. तलाव शंभर टक्के भरून घेण्यात यावा अशी मागणी या क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!