मराठा आरक्षण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधी पक्षनेते फडणवीस यांना फोन

टीम : ईगल आय मीडिया

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर मराठा आरक्षण प्रश्नी पुढील दिशा ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली आहे.

“मराठा आरक्षणावर स्थगिती आल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही. मराठा आरक्षण पुन्हा बहाल करण्यासाठी सरकार जो काही निर्णय घेईल, त्याला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, हे आश्वस्त केले.” असं फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मराठा आरक्षण हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही, मराठा आरक्षण पुन्हा बहाल करण्यासाठी सरकार जो निर्णय घेईल, त्याला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, असं विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आश्वस्त केलं असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!