महाआघाडी सरकार केव्हाही कोसळेल : खासदार नाईक – निंबाळकर

मोहोळ येथे भाजपच्या कार्यक्रमात उपस्थित खास निंबाळकर

मोहोळ : ईगल आय मीडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला एक वर्ष पुर्ती सोहळा दिन मोहोळ येथे तालुक्याचे समन्वयक खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या शुभहस्ते साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे नेते संजय क्षिरसागर,भाजप तालुका अध्यक्ष सतिश काळे, रमेश माने, सुशिल क्षिरसागर, बाळासाहेब पाटील, जयकुमार शिंदे, अभिजीत निंबाळकर उपस्थित होते.
यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे हस्ते पंतप्रधानांनी संबोधित केलेले पत्र वाटप करण्यात आले. यावेळी बोलतांना खासदार म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने एका वर्षात अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या आहेत, शेतकरी,मजुर, कष्टकरी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. व्यापारी, लघुउद्योग यांना व्यावसाय करण्यासाठी कर्ज योजना मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात राज्य सरकारला २८ हजार कोटी रुपये दिले परंतु
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही ठोस भुमिका घेतली नाही .मोलमजूर लोकांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल झाले हे तीन चाकी सरकार अपयशी ठरले आहे . तीन पक्षाच्या बंडाळीने हे सरकार केव्हा हि कोसळेल त्यामुळे राज्यातही भाजपचे सरकार कधीही येईल. कार्यकर्त्यांनी सावध राहवे व जनतेचे प्रश्न सोडववेत. मी जरी माढयाचा खासदार असलो तरी मोहोळचे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे असे आश्वासन दिले. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!