बारामती येथे खा . शरद पवार यांच्याशी चर्चा करताना आ. सावन्त, आ.देशपांडे, आ. पाटील
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी खा शरद पवार यांची घेतली भेट
पंढरपूर : ईगल आय मीडिया
राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात बदल झाले आहेत, त्यामुळे अनेक समस्या जटिल बनत आहेत, त्यात कोरोनाच्या संकटामुळे शिक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असला तरी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन राष्ट्रवादीग्चे राष्ट्रीय अध्यक्ष खा शरद पवार यांनी दिले असल्याची माहिती आ दत्तात्रय सावंत यांनी दिली.
सोमवारी मुंबई येथे शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट शासकीय निवासस्थानी आ दत्तात्रय सावंत, आ श्रीकांत देशपांडे व आ बाळाराम पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली होती. मुंबई येथे खा शरद पवार यांची भेट न झाल्याने आज बारामती येथे येऊन शिक्षक आमदारांनी भेट घेतली.
उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजितदादा पवार यांचे सोबत शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांची सह्याद्री येथे बैठक संपन्न झाली. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी 13 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयातील प्राथमिक माध्यमिक व उच्चमाध्यमिक नव्याने 20 टक्के अनुदान सुरु करावायाची नस्ती आणी 20 टक्के ची टप्पा वाढ ही नस्ती सादर करण्याचे आदेश संबधितांना दिले होते, अशी माहिती आ सावंत यांनी दिली.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सेवासंरक्षण आणी नव्याने जाहिर करावयाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्या तसेच कमवी चे 1298 वाढीव पदे यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. शिक्षकांचे प्रश्न लवकर मार्गी लागावेत म्हणून शिक्षण विषयक सर्वच समस्या मांडण्या करीता खा. शरद पवार यांची भेट महत्वाची होती. खा पवार यांना राज्यातील कृषी क्षेत्राएवढीच शिक्षण क्षेत्राची माहिती आहे, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना फोन करून चर्चा केली. तसेच इतर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावले जाणार आहेत अशी माहिती आ सावंत यांनी दिली.
वर्ष २०२०-२१ हे एक जुलै पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, शाळा निर्जंतुक करण्यासाठी तसेच भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने निधी देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा कोरोनापासून बचाव होणे महत्त्वाचे आहे यावर खा पवार यांच्या शी चर्चा झाली असल्याचे आ सावंत म्हणाले.