अद्यापही व्हेंटिलेटर सपोर्टवर असल्याची माहिती
टीम : ईगल आय मीडिया
टीम : ईगल आय मीडिया माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर असून त्यांना अजूनही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले आहे अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयाकडून देण्यात आली. कोरोना बाधित झाल्यानंतर दिल्लीमधील आर्मी रुग्णालयात सध्या ते दाखल आहेत. सोमवारी त्यांची मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्यापही गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. प्रणव मुखर्जी यांना करोनाची लागणही झाली आहे.
प्रणव मुखर्जी यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या मेंदूमध्ये एक गाठ होती. यामुळे डॉक्टरांना त्यांच्यावर सर्जरी करावी लागली. ही सर्जरी यशस्वी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ८४ वर्षीय प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली आहे.