पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर नगर परिषदेच्या नियोजित यमाई तलाव परिसरातील बुद्धभूमीवर आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा वर्षावासाचे आयोजन सम्यक क्रांती मंचाच्या वतीने करण्यात आले होते.
विज्ञाननिष्ठ बौध्द जीवनमार्ग अनुसरणाऱ्या लोकशाहीप्रेमी नागरिकांना या वर्षावास कार्यक्रमात सहभागी करून घेण्यासाठी सम्यक क्रांती मंचच्या विद्यमाने दिनांक 05 जुलै 2020 रोजी, आषाढी पौर्णिमा (प्रथम धम्मचक्र प्रवर्तन दिन) पासून ते दिनांक 01 ऑक्टोबर 2020 पर्यंत येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांना जागृत करण्यासाठी व या महामारीला हद्दपार करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
प्रथम धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त बुध्द वंदनेने वर्षावास प्रारंभ करण्यात आला. विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून श्रमदानातून परिसराची स्वच्छता करण्यात आली, तसेच धम्मापदाचे पठण करण्यात आले. श्रावण पौर्णिमेला तथागत बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर पहिल्या धम्मसंगितीच्या सुरुवातीचा दिवसाचे औचित्य साधून धम्मपदाचे पठण करण्यात येणार आहे. तसेच भाद्रपद पौर्णिमेला धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अश्विन पौर्णिमेला भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन करण्यात येईल व अशोका विजयादशमी दिनी कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल. सदरचा कार्यक्रम फिजीकल आणि सोशल डिस्टसींग ठेवून करण्यात आला.
यावेळी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ मार्गदर्शक सिद्धार्थ जाधव, सम्यक क्रांती मंचाचे अध्यक्ष प्रशांत लोंढे, बहुजन समाज पार्टी चे विधानसभा अध्यक्ष रवी सर्वगोड, रवी शेवडे, धम्ममित्र प्रभाकर सरवदे, स्वप्निल गायकवाड, धम्ममित्र शरद दंदाडे इत्यादी उपस्थित होते.