सलग 51 दिवस अन्नदान : पंढरीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी

पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे अडकलेल्या 300 मोल मजुरांचे सलग 51 दिवस जेवण चालू ठेवून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मित्र परिवाराने पंढरपुरात एक नवा विक्रम केला आहे.

विशेष पाहता या मंडळातील प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतः कमावणारा असून यात कोणाची रिक्षा,कोणाचा टांगा तर कोणाचे चहाचे हॉटेल असे हे छोटे व्यावसायिक मित्र आपल्या कुटुंबावर होणाऱ्या अडचणींचा विचार न करता सामाजिक जबाबदारी पार पाडण्याच्या उद्देशाने या कठिण समयी एकत्र येवून सलग ५१ दिवस झाले अन्नदान करण्याचा उपक्रम पार पाडत आहेत.

आज ५१ वा दिवस असल्याने अन्नदाना सोबत गरजू लोकांना रेशन धान्याचे १५० किट पंढरपूर शहरातील युवकांचे प्रेरणास्थान असणारे प्रांताधिकारी सचिन ढोले साहेब व पंढरपूर नगरपालिकेचे मुख्यधिकारी अनिकेत मनोरकर यांच्या उपस्थिती मध्ये वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रांताधिकारी ढोले व मुख्याधिकारी मानोरकर यांनी तरुण सहकाऱ्यांनी एकत्रित येवून केलेल्या या कामाचे कौतुक केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पध्दतीने परकीय शक्तींशी लढा दिला त्याच पध्दतीने या तरुणांनी कोरोना विरूध्द लढाई सुरू ठेवली.
या तरूणांनी आपले घर आपला परिसर कोरोना पासून कसा दूर ठेवता येईल यासाठीही प्रयत्न करावेत असे सांगून सचिन ढोले यानी तरुणांचे कौतुक केले.

Leave a Reply

error: Content is protected !!