सोलापुरात कोरोनाचा कहर : नव्याने 21 रुग्ण बाधित

सोलापूर : ईगल आय मीडिया

सोलापूर शहरात सुरू असलेला कोरोनाचा कहर नियंत्रणात येत नाहीये. गुरुवारी आलेल्या अहवालात नव्याने 19 रुग्ण पॉजीटीव्ह निघाले असल्याने प्रशासन हादरून गेले आहे. सोलापूर शहरात यापूर्वी 79 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत तर ग्रामीण भागात 2 रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी आलेल्या तपासणी अहवालानुसार 21 रुग्णांचे अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत. यासंदर्भात पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी सोलापूर येथे ही माहिती दिली. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मिळून कोरोना बाधित रुग्णांची संख्या 102 वर पोहोचली आहे. कोरोनाचा हा कहर कसा नियंत्रित करायचा असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे असेही यावेळी ना भरणे म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!