एम एस धोनी फेम अभिनेता सुशांत सिंहची आत्महत्या

टीम : ईगल आय मीडिया
हिंदी सिनेमातील आघाडीचा अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने वांद्रे येथील घरी आत्महत्या केली आहे. आघाडीच्या अभिनेत्याने आत्महत्या केल्याने बॉलिवूडला जोरदार धक्का बसला आहे.
सुशांतसिंग राजपूत याच्या नोकराने पोलिसात दिलेल्या माहितीनुसार सुशांत राजपूत याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, 34 वर्षीय सुशांतसिंग याने दुरचित्रवाहिनी वरील मालिकांमधून आपल्या फिल्मी करियरला सुरुवात केली होती. 2013 साली आलेल्या काय पो चे या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी, एम एस धोनी, केदारनाथ, छीचोरे हे गाजलेले चित्रपट होत.
त्याच्या ms धोनी, केदारनाथ या चित्रपटांनी 100 कोटी ची कमाई केल्याने सुशांतसिंग आघाडीचा बॉलिवूड कलाकार म्हणून प्रस्थापित झाला होता. अशा अभिनेत्यांच्या आकस्मिक मृत्यूने बॉलिवूड ला धक्का बसला आहे.

सुशांत सिंह राजपूतचा प्रवास
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने किस देश मे है मेरा दिल मालिकेतून त्याने कलाविश्वात पदापर्ण केलं, त्यानंतर पवित्र रिश्ता मालिकेतून तो प्रसिद्ध झोतात आला. 2013 साली काय पो चे चित्रपटामधून त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने शुद्ध देसी रोमान्स, पीके, एमएस धोनी, छिछोरे यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या होत्या.
जरा नच के दिखा, झलक दिख ला जा रिऍलिटी शोमध्येही त्याने सहभाग घेतला होता.

सुशांतने नैराश्यात असल्याची माहिती मिळत आहे. त्यातूनच करियरच्या टॉपला असताना त्याने असं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. सुशांतची अशी अकाली एक्झिट सर्वांसाठीच धक्कादायक आहे.
21 जानेवारी 1986मध्ये पाटण्यात त्याचा जन्म झाला होता. अगदी लहान वयातच त्याचे मातृछत्र हरपलेे होते. त्याने इंजिनिअरिंगची पदवीसाथी प्रवेश घेतला होता.

Leave a Reply

error: Content is protected !!