सोलापुरात नव्याने 13 कोरोना बाधित रुग्ण

एकूण 81 कोरोना रुग्ण, तर 6 जणांचा मृत्यू

सोलापूर : ईगल आय मीडिया
आज बुधवारी सोलापूर शहरात नव्याने 13 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांचा आकडा 81 वर पोहोचला आहे. आज अहवाल आलेल्या बाधित 13 रुग्णामध्ये 4 पुरुष तर 9 स्त्री रुग्णांचा समावेश असून यातील 3 महिला या सदर बाजार लष्कर परिसरातील आहेत. तर आंबेडकर नगर, माऊली चौक,शामानगर, बिग बाजार जवळ,मार्कंडेय नगर, कुमठा नाका,शास्त्री नगर,ताई चौक, एम आय डी सी परिसरातील प्रत्येकी एका महिला रुग्णाचा यामध्ये समावेश आहे . तसेच 70 फूट इंदिरा नगर येथील 3 तर शनिवार पेठ पाछा पेठ जवळील एका पुरुष रुग्णाचा समावेश आहे. त्यांच्यावर आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आलेत तर कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांना ताब्यात घेण्यात येऊन त्यांची देखील तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजवर एकूण 1624जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी 1250 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1169 इतके निगेटिव तर 81 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आजवर पॉझिटिव्ह 81 रुग्णांपैकी सहा जणांचा मृत्यू झालाय तर 75 रुग्ण उपचार घेत आहेत. अद्याप 374 जणांचे वैद्यकीय अहवाल हे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!