आनंदाची बातमी : सोलापुरातून 3 रुग्ण कोरोनामुक्त
सोलापूर : ईगल आय मीडिया
सोलापूर च्या अश्विनी रुग्णालयात उपचार घेत असलेले कोरोना बाधित 3 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने आज ( गुरुवारी ) घरी सोडण्यात आले. गेल्या 13 एप्रिल रोजी पहिला कोरोना रुग्ण सापडल्या नंतर तणावात असलेल्या जिल्हावासीयांना तसेच प्रशासनासाठीही आजची ही घटना दिलासादायक ठरली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरने यांच्या उपस्थितीत या रुग्णांना निरोप देण्यात आला. दरम्यान अश्विनी रुग्णालय पुढचा आठवडा भर स्वच्छतेसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ घुली यांनी दिली.