पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहर व तालुक्या साठी आजच्या दिवसाची सुरुवात चिंता वाढवणारी ठरली आहे. रात्री उशिरा मिळालेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात 3 तर करकंब येथे 2 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
रविवारी दिवसभरात प्राप्त झालेले सर्वच 53 अहवाल निगेटिव्ह आले होते. तर आणखी 71 अहवाल येण्याची प्रतीक्षा होतीे. त्यापैकी रात्री उशिरा 12 अहवाल मिळाले असून त्यातील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये पंढरपूर शहरातील 3 जणांचे तर करकम्ब येथील 2 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या 27 झाली आहे. अद्यापही 59 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. त्यापैकी 6 जणांचे swab तपासणीसाठी परत मागवण्यात आलेले आहेत असे समजते.
पंढरपूर तालुका : दिनांक ६ जुलै सकाळी १० वाजताची स्थिती
आजपर्यंत पंढरपूरमधून ३५ रुग्ण कोरोना positive निघाले आहेत. त्यापैकी ८ बरे झाले असून सद्यस्थितीला एकूण २७ रुग्ण active आहेत. त्यातील २० रुग्ण को विड केअर सेंटर वाखरी येथे, तर ६ सोलापूर व १ पुणे येथे उपचार घेत आहेत. २७ पैकी २ दूरदर्शन मुंबई चे आहेत. ४ निवासी पत्या नुसार इतर तालुक्याचे आहेत परंतु पंढरपूर कनेक्शन आहे. २१ पंढरपूर तालुक्यातील आहेत (ग्रामीण ५ शहर १६)डॉ.एकनाथ बोधले,
ता.वैद्यकीय अधिकारी
पंढरपूर शहरातील एका बँकेच्या संचालकांचा मुलगा आजच्या पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या मध्ये आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कुतु8इतरांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
उर्वरित 59 आणि नव्याने swab मागवलेल्या 6 जनांसह 65 अहवाल येणे अपेक्षित आहे. त्याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे,।