पंढरीत आणखी 10 पॉझिटिव्ह रुग्ण


पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर शहरात 8 तर ग्रामीण भागात 2 असे एकूण 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मंगळवारी निष्पन्न झाले आहेत. त्याचबरोबर शहर व तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 64 वर पोहोचली आहे.
या संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांनी दिलेल्या माहिती नुसार मंगळवारी 41 टेस्टिंग अहवाल आले आहेत. त्यापैकी 10 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आलेले आहेत. तर 31 अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये संतपेठ परिसरातील महापूर चाळ येथील 8 जण पॉझिटिव्ह असल्याचे तर 1 जण रोपळे, 1 कान्हापुरी ( पंढरपूर ) येथील आहेत. त्याचबरोबर mit कोविड सेंटर येथे मंगळवारी 41 अहवाल मिळाले. 80 जणांचे रॅपिड टेस्ट केले त्यापैकी 2 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आणखी 79 अहवाल प्रलंबित आहेेेत.
या बरोबरच शहर व तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 64 झाली आहे. त्यापैकी 33 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर उर्वरित 29 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!