पंढरपूर येथे रविवारी आदर्श शिंदे यांच्या गाण्याचा जलवा

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गुरुशिष्य वंदना गीताचा कार्यक्रम

फोटो
रविवारी होत असलेल्या गुरुशिष्य वंदना कार्यक्रमाच्या मंचाचे पूजन करतेवेळी अभिजित पाटील, सुनील सर्वगोड आणि इतर पदाधिकारी. 

पंढरपूर ; eagle eye news

 महात्मा ज्योतिराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्राचे महागायक आदर्श शिंदे यांच्या गुरुशिष्य वंदना गीतांचा कार्यक्रम दि.१६एप्रिल रोजी सायं ६वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल (गोपाळपूर रोड)  येथे विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन करण्यात  आला असल्याची माहिती  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत  पाटील यांनी दिली.  

विशेष म्हणजे पंढरपूर तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच महागायक आदर्श शिंदे यांचा हा गीतांचा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असेहि  आवाहन पाटील यांनी केले आहे. या कार्यक्रमाचा मंच उभारणी कामाची पाहणी केल्यानंतर पाटील बोलत होते.

 यावेळी अभिजीत  पाटील यांच्या बरोबरच रिपाइंचे नेते  सुनील सर्वगोड,  संतोष पवार, संतोष  सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, सिद्धार्थ जाधव, महेश साठे, उमेश सासवडकर, उमेश सर्वगोड, ॲड.कीर्तीपाल सर्वगोड, पत्रकार अभिराज उबाळे, प्रशांत लोंढे, नाना वाघमारे, अजित खिलारे, समाधान लोखंडे, सागर गायकवाड, स्वप्नील कांबळे, समाधान बनकर, दत्ता माळी, श्रीनिवास उपळकर, आण्णा वायदंडे यासह आदी पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!