खा. सुप्रिया सुळे यांच्या विषयी अब्दुल सत्तारांची बेताल बडबड

राष्ट्रवादी काँग्रेस संतप्त : २४ तासांत माफी मागा अन्यथा …

टीम : ईगल आय न्यूज

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्याविषयी अतिशय गलिच्छ शब्दप्रयोग केला आहे. यामुळे राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस संतप्त झाली आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी, “इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ”, असं म्हटलं आहे. यानंतर पुन्हा एकदा सत्तार यांनी “ते आम्हाला खोके बोलू लागले आहेत, आमचे खोके त्यांचे डोके तपासावे लागेल, ज्यांचे डोके तपासावे लागेल खोक्याची आठवण येऊ लागली आहे. त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो”, असंहि अब्दुल सत्तार म्हणाले

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी यावर बोलताना, महाराष्ट्रातील अनुभवी मंत्र्यानं घाणेरड्या पातळीवर जाऊन बोलणं चुकीचं आहे. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा काँग्रेस तर्फे निषेध करते. सत्तार यांनी या प्रकरणी माफी मागावी, असं म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी, अब्दुल सत्तार यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही,सत्तार यांनी या प्रकरणी माफी मागावी, असा इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांना शब्द मागं घेण्यासाठी २४ तासांची मुदत देत असल्याचं म्हटलं आहे . येत्या २४ तासात अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी, असं मिटकरी म्हणाले. तर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेबूब शेख यांनी सत्तार यांचे पुतळे महाराष्ट्रभर जाळले जातील,असं म्हटलं आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!