अण्णा गटाचा ही पाटील – पवार आघाडीला पाठिंबा
पंढरपूर : ईगल आय न्यूज
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील आणि ऍड दीपक पवार हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काळे यांच्या समोर मोठे आव्हान उभा राहिले आहे.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी काळे यांच्यासह अभिजीत पाटील आणि दीपक पवार यांचे स्वतंत्र पॅनल उभा आहेत.
यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, २०१६ साली तिरंगी लढत झाल्याने परिवर्तन टळले होते. मात्र या निवडणुकीत ती चूक दुरुस्त केली. सत्ताधाऱ्यांची झोप उडवणारी ही आघाडी आहे. एकत्र येताना मागील सहा वर्षात केलेल्या संघर्षाला पुढे घेऊन जायचा प्रयत्न आहे. निवडून येण्याचा विश्वास या आघाडीने निर्माण केला आहे. ऊस बिले आणि कारखाना चालवणे यासाठी योग्य त्यांना संधी दिली जाईल. कुणाचा ही ऊस कधीही अडवला जाणार नाही. सहकार शिरोमणी चे सहा लाख टन ऊस गाळप चे उद्दिष्ट आहे. सहकार शिरोमणी मध्ये पैसे भरलेल्या शेत्रक्याचे सभासदत्व दिले जाईल. औदुंबर अण्णा, भारत नाना, यशवंत भाऊ यांच्या कुटुंबातील एकही सभासदत्व ठेवले नाही. तुमच्या सोयीने विठ्ठल परिवारात सभासद ठेवले. मग परिवार कसला ?
निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता दिसत असताना, पडद्यामागे राजकीय घडामोडी घडल्या आणि अभिजीत पाटील आणि एड दीपक पवार यांच्यात चर्चा होऊन दोन्ही गट निवडणुकीत एकत्र येण्याचे ठरले आहे. त्यानुसार पाटील आणि पवार यांनी शहरात संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे.
ऍड दीपक पवार म्हणाले की, मागील निवडणुकीत तिरंगी सामना झाला, म्हणून पराभव झालं. मात्र यावेळी त्या चुका टाळून या निवडणुकीत पुढे जाण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमचा विरोध कल्याणराव काळे यांना नाही, त्यांच्या निष्क्रियता, आणि कारभाराला आहे. कोणत्याही वर्षी वेळेवर बिल मिळाले नाही, असा राज्यातील हा एकमेव कारखाना आहे. सहांपैकी पाच वर्षे आर आर सी ची कारवाई झालेला हे दुर्दैव आहे. सीताराम मध्ये ७ हजार सभासदांचे पैसे अडकले आहे, त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देऊ, आजवर २४०० सभासदांना पैसे मिळाले आहेत.त्या सर्वांना विनंती आहे की आम्हाला साथ द्यावी.
यावेळी अभिजीत पाटील, ऍड दीपक पवार, डॉ. बी पी रोंगे, अमरजित पाटील यांच्या सह विट्ठल चे संचालक आणि दीपक पवार यांचे समर्थक उपस्थित आहेत.