तूंगत येथे जंगी प्रचार सभा संपन्न
पंढरपूर : प्रतिनिधी
आपलं मत हे अभिजीत पाटील यांना नसून तालुक्याच्या विकासाला आहे.जसं विठ्ठलच्या निवडणुकीत मतदान रुपी आशीर्वाद दिला तो सार्थ ठरवून दाखवला. तसेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण अभिजीत पाटील यांच्या पाठीशी राहून आशीर्वाद देऊ नक्कीच ते आपले प्रश्न विधानसभेमध्ये मांडतील, असा विश्वास खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.
माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांची पहिली सभा तुंगत येथे संपन्न झाली. यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, निवडणूक ही कारखान्याची नसून विधानसभेची आहे. तालुक्यामध्ये प्रश्न बरेच आहेत. त्या प्रश्नावर आपण बोलू ऊस आणि कारखाना हा विधानसभेतील प्रश्न नाही. मी जो काही शब्द देतो तो मी पूर्णच करतो. मला राजकारण करायचं नाही समाजाची सेवा करायची आहे. वंचित शोषित यांना न्याय देण्याचे काम करायचे आहे. या भागाचा विकास करण्यासाठी मतदान रुपी आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी द्यावी.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी बोलताना सांगितले की, शंकरराव मोहिते-पाटील, स्वर्गीय औदुंबरअण्णा यांनी सहकार हे स्वतःच्या कुटुंबासारखे जपले आणि चालवले काही राजकीय लोकांनी सहकार मोडून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु अभिजीत पाटलांसारखा वाघ त्यांना टक्कर देण्यासाठी तयार झाला. सामान्य शेतकरी कुटुंबातील पोरग ह्यांना वरचढ चालायला लागले आहे. आमच्याकडील १४ गावातून मोठे मताधिक्य मिळेल. मला इथल्या जनतेकडून सुद्धा तसाच शब्द पाहिजे इकडचा भाग वणवे झाला पाहिजे.
याप्रसंगी विठ्ठल मा.संचालक रामदासबापू रणदिवे, संचालक विठ्ठलनाना रणदिवे, पांडूरंग कदम, बाळासाहेब सालविठ्ठल, डॉ.आबासाहेब रणदिवे, डॉ.योगेश रणदिवे, धनाजी रणदिवे, राजाभाऊ रणदिवे, मारुती रणदिवे, रायाप्पा हळणवर, तुकाराम मस्के, अमित साळुंखे, पंकज लामकाने, ताज मुलांनी, औदुंबर गायकवाड यांसह आदी अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.