विठ्ठलचे माजी संचालक ज्ञानेश्वर गायकवाड, संतोष गायकवाड यांच्यासह अनेकांचे अभिजीत पाटील गटात प्रवेश
पंढरपूर : ईगल आय न्यूज
साखर कारखान्याची निवडणूक असताना सत्ताधाऱ्यांकडून प्रचाराचे मुद्दे भरकटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऊस बिल कधी मिळणार यावर बोलत नाहीत 31कोटी बिल कसे देणार हे सांगत नाहीत येणारा पुढील गाळप हंगामासाठी पैसे कुठून उपलब्ध करणार हे सांगत नाहीत. कारखान्यासाठी 426 कोटी रुपये कर्ज काढला आहे त्याचं काय केलं हे सांगत नाहीत साखर कारखानदारी, ऊस बिल, केलेलं गाळप आणि शेतकऱ्याची थकीत बिले यावर बोलण्या ऐवजी प्रचार दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रकार केल्याचा आरोप अभिजीत पाटील यांनी चळे ( ता. पंढरपूर ) येथे बोलताना केला.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त चळे येथे अभिजीत पाटील गटाची जाहीर सभा झाली. यावेळी डॉ. बी. पी. रोंगे, विष्णू बागल यांच्यासह सर्व पदाधिकारी, विठ्ठलचे संचालक उपस्थित होते.
यावेळी ज्ञानेश्वर गायकवाड यांनी बोलताना, चळे गावातील अनेक सभासदांचे सभासदत्व रद्द केले आहे कल्याणराव काळे यांनी गावातील सभासदांची कधीच संपर्क ठेवला नाही, उसाची बिल कधीच वेळेवर दिले नाहीत, यामुळे सभासद कल्याणराव काळे यांच्यावर नाराज आहे. विठ्ठल कारखाना अभिजीत पाटलांशिवाय कोणी चालू करू शकत नव्हता. आणि त्यांनी यशस्वी गाळप करून शेतकऱ्यांना मागील सर्व थकीत देणी देण्याचे काम केल्यामुळे आम्ही सर्व पारदर्शक कारभार करणाऱ्या आणि कारखाना चालवणाऱ्या माणसाच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला असून आमचे आशीर्वाद आणि भक्कम साथ त्यांना राहील, असे सांगितले.
यामध्ये ज्येष्ठ नेते आणि विठ्ठल चे माजी संचालक ज्ञानेश्वर मोरे, त्यांचे चिरंजीव माजी संचालक यांनी अभिजीत पाटील गटात जाहीर प्रवेश केलं. तसेच विद्यमान सरपंच ज्ञानेश्वर शिखरे, उपसरपंच अमोल मोरे, माजी उपसरपंच सचिन मोरे, माजी उपसरपंच चरणदास कोळी, सुशील वाघमारे, प्रताप गायकवाड, डॉ.रामदास घाडगे, समाधान लोमटे (पुळूज) यासह अनेकांनी अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश केला आहे.