लोकसभेला जेवढे लिड मला दिले, त्यापेक्षा दुप्पट अभिजीत पाटील यांना द्या : खा. मोहिते पाटील


रांझणी (भिमानगर) येथून अभिजित पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ


हजारोंच्या उपस्थितीत जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ

पंढरपूर : प्रतिनिधी

माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ रांझणी भिमानगर ता. माढा येथून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.

यावेळी खा.धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की; विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सभासद हा कैलासवासी औदुंबर आण्णा पाटील आणि शरदचंद्र पवार यांच्या विचारांच्या पाठीशी कायम उभा राहिलेला आहे. त्याच विचारांवर अभिजीत पाटील यांच्यासोबत देखील उभा राहील असा ठाम विश्वास आहे.लोकसभेला जेवढे लिड मला दिले आहे त्यापेक्षा डबल मतांनी अभिजीत पाटील यांना निवडून देण्याचे आश्वासन यावेळी बोलताना दिले.

यावेळी बोलताना उमेदवार अभिजीत पाटील यांनी सांगितले की; भीमा नदी पट्ट्यातील अनेक भागात केळी उत्पन्न जास्त असून यासाठी केळी संशोधन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर ही केळी परदेशात निर्यात व्हावी यासाठीही पुरेपूर पाठपुरावा करणार आहे. ड्रायफूड निर्मिती प्रक्रियेसही प्राधान्य देणार आहे. यामुळे केळी, डाळिंब, द्राक्षे यांना भरघोस आणि उत्तम असा दर मिळेल. महाराष्ट्रातील सर्वात मोठे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असूनही पाण्याचे योग्य नियोजन या लोकप्रतिनिधींनी कधीच केले नसल्यामुळे हे धरण मायनस मध्ये जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर नदीवरील बंधाऱ्याची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात लाखो लिटर पाणी वाया जाते. हे पाणी आपल्याला बंधाऱ्याची उंची वाढवल्यास वापरता येईल. याकरता योग्य नियोजनाची गरज असल्याचाही त्यांनी नमूद केले.

माढा व पंढरपूर तालुक्यात रोजगार निर्मितीचा प्रश्न गंभीर असून यासाठी एमआयडीसी उभारण्याची गरज आहे. एमआयडीसीसाठी शेकडो एकर जमीन असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक लोकांना गंडवत आहेत. यामुळे हजारो लोकांचा रोजगार बुडत असून आपल्याला निवडून दिल्यास एक वर्षाच्या आत एमआयडीसीचा प्रश्न सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले. सोबतच उजनी धरणावर पर्यटन स्थळ निर्माण करून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा शब्दही त्यांनी दिला. त्याचबरोबर उपसा सिंचन योजनेस कोणताही धक्का लागणार नाही असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील शिवसेना (उबाठा) साईनाथ भाऊ अभंगराव, संभाजीराजे शिंदे, धनंजय डिकोळे, भारत नाना पाटील बाळासाहेब पाटील, बाळासाहेब तात्या ढवळे, दिनेश जगदाळे, रावसाहेब नाना देशमुख, बाबूतात्या सुरवसे, काकासाहेब पाटील, मधुकर देशमुख, पोपट तात्या अनपट, सागर पडगळ, औदुंबर महाडिक, गोविंद पवार, अरुण तोडकर, सौदागर जाधव, दत्ताभाऊ ढवळे, सुरज भैय्या देशमुख, आकाश पाटील, प्रताप मिसाळ, माणिक अण्णा लांडे, प्रशांत पाटील, रविकांत पाटील, सचिन जगताप, अशोक बिचुकले, हरिभाऊ माने, सागर गिड्डे, दीपक खोचरे, ॲड.विजय गिड्डे, मधुकर ठोंबरे, राजाभाऊ भंगिरे, तुकाराम मस्के, सुवर्णा शिवपुरे, अनिता पवार, प्रमोदिनी लांडगे, विनिती कुलकर्णी, स्नेहा निंबाळकर, ऋतुजा सुर्वे, सुंदरताई माळी यांसह अधिक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!