पुण्याचे MPSC चे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना केली एक लाखांची मदत
पंढरपूर : ईगल आय मीडिया
धाराशिव साखर कारखाना युनिट १,२,३ चे चेअरमन व पंढरपूरचे युवा नेते अभिजीत आबा पाटील यांचा १ ऑगस्ट रोजी संपूर्ण जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. अभिजीत पाटील यांनी MPSC च्या नेमणुक न मिळाल्याच्या तणावाने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात दिला.
लोणकर घरात एकूलता एक तरूण मुलगा गेल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे. त्यामुळे फुल ना फुलाची पाकळी म्हणून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने मदत केली.असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.
लोणकर त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.याची जाणीव ठेवून अभिजीत पाटील यांनी एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश स्वप्निल लोणकर यांच्या वडिलांच्या हातात सुपूर्द केला.