प्रत्येक सभासदाला न्याय मिळवुन देण्याची अभिजीत पाटील यांची ग्वाही
पंढरपूर : प्रतिनिधी
विठ्ठल ची निवडणूक ही विचारांची लढाई आहे, कारखान्याच्या हिताचे मुद्दे मी मांडत आहे, विठ्ठलच्या प्रत्येक सभासदाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही श्री विठ्ठल परिवर्तन विकास पॅनेलचे प्रमुख अभिजित पाटील यांनी दिली. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासंदर्भात उपरी येथे झालेल्या विचार विनिमय बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपरीचे सरपंच ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह अनेक शेतकरी व नेत्यांनी अभिजीत पाटील गटात प्रवेश केला आहे.
यावेळी बोलताना अभिजीत पाटील यावेळी म्हणाले की, ‘कारखान्याची लढाई ही विचारांची लढाई आहे. ती विकासाने बोलली पाहिजे. वैयक्तिक टीकाटिप्पणी करून सभासदांची मने जिंकण्याचा कुणी प्रयत्न करून नये. विकासाचे धोरण मी सभासदांपुढे मांडत आहे. कारखान्यात फक्त शेतकरी सभासद, कामगार हितालाच प्राधान्य असेल. कारखाना सुरू झाल्यावर पहिला हफ्ता हा २५०० रुपयांचा असेल असेही आश्वासन त्यांनी दिले.या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश केला आहे.
उपरीच्या सभेत उपरीचे सरपंच ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पाटील गटात केला जाहीर प्रवेश केला. मगरवाडी येथील जालिंदर नकाते, हनमंत जगदाळे, हनुमंत हिंगे तसेच सुपली येथील शिवाजी सोपान माळी, मोहन माळी, सुखदेव विठोबा यलमार, बाळासाहेब लाडे, शिवाजी ज्ञानोबा यलमार, भारत दामू लाडे, अरुण घाटूळे, दिपक यलमार, सुरेश दशरथ घाटूळे, कांतीलाल रामहरी यलमार,अनिल यलमार, शामराव यलमार, आनंदा माळी, औदुंबर सुदाम लाडे, अनिल यलमार, दीपक यलमार, वाडीकुरोली येथील संजय नामदेव काळे, तावशी येथील शिवाजी कृष्णात शिंदे, धोंडेवाडी येथील रघुनाथ धर्मा देठे, उमेश देठे, सुनील ताठे यांनी अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश केला आहे.
फोटो उपरी ता.पंढरपूर येथील सभेत बोलताना अभिजित पाटील आणि समोर उपस्थित शेतकरी, सभासद