तीन वाहनांचा अपघात : 5 जण ठार

एकाच कुटुंबातील 4 जनांचा मृतांमध्ये समावेश

अपघातग्रस्त जीप

टीम : ईगल आय मीडिया

पुणे एक्सप्रेसवेवर ट्रेलर, कार आणि टॅम्पो या तीन गाड्या एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 4जनांसह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरने टेम्पोला धडक दिली. त्यानंतर टेम्पो पलटी झाल्यावर मागून येणाऱ्या दोन कार टेम्पोला धडकल्या. तर, या चार गाड्यांवर मागून भरधाव येणारा टेम्पो धडकला, असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर खंडाळा घाटातील फुडमॉल जवळ भरधाव कंटेनरची चार वाहनांना जोरदार धडक दिली, हा अपघात आज मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास झाला आहे.

या अपघातात तीन महिला, एक पुरुष व एका पाच वर्षीय मुलीचा समावेश आहे, नवी मुंबई महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ वैभव झुंझारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.

१) श्रीमती मंजू प्रकाश नाहर, वय ५८ २) डॉ. वैभव वसंत झुंझारे, वय ४१ ३) सौ. उषा वसंत झुंझारे, वय ६३ ४) सौ. वैशाली वैभव झुंझारे, वय ३८ ५) कु.श्रिया वैभव झुंझारे, वय-५ अशी या अपघातातील मयतांची नावे आहेत.

एका कार्यक्रमासाठी झुंजारे कुटुंब पुण्याला गेले होते. पुण्याहून परतत असताना फुडमॉल जवळ हा अपघात घडला आहे. यात झुंझारे कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून ११ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. तर, दुसऱ्या कारमधील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!