बस दरीत कोसळली 25 ठार

टीम :ईगल आय मीडिया

उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) जिल्ह्यात यमुनोत्रीकडे (Yamunotri) जाणाऱ्या मध्य प्रदेशातील भाविकांच्या बसला भीषण (Bus Accident) अपघात झाला. डामटा ते नौगावमध्ये ही बस २०० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेत २५ जणांचे मृतदेह सापडले आहेत. बसमधून २८ भाविक प्रवास करत असल्याची माहिती आहे.

 चारधाम यात्रेतील यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक बस रविवारी सायंकाळी उत्तर काशीनजीक दरीत कोसळून झालेल्या अपघातात किमान २५ जण ठार झाले. ही बस ३० प्रवाशांना घेऊन यमुनोत्रीला जात होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही बस यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरून यमुनोत्रीकडे जात होती. उत्तराखंड राज्याच्या हद्दीत दामता येथे ही बस दरीत कोसळली. बसमध्ये भाविक हे मध्य प्रदेशातील पन्ना येथील आहेत. अपघात झालेले ठिकाण हे उत्तर काशी ते देहरादून यांच्या दरम्यान आहे.

उत्तरकाशीत झालेल्या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अपघातात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर, जखमींना उपचारासाठी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

उत्तराखंडमध्ये चारधाम तीर्थयात्रेला गेलेल्या यमुनोत्री धामकडे जाणाऱ्या भाविकांची बस कोसळली. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला आहे. उत्तरकाशी जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जाणारी बस २०० मीटर खोल दरीत कोसळली.मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील भाविकांचा मृत्यू दु:खदायी आहे, असं शिवराजसिंह चौहान म्हणाले.


शिवराजसिंह चौहान यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याशी फोन वरुन चर्चा केली असल्याचं म्हटलं आहे. जखमींवर आवश्यक ते उपचार करण्यात यावेत यासाठी पुष्कर धामी यांच्या संपर्कात असल्याचं ते म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!