गुरसाळे येथे अपघात

ट्रॅक्टर ट्रॉलीस धडकून मोटारसायकल स्वार जाग्यावर ठार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गुरसाळे ( ता. पंढरपूर ) येथे रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ऊस वाहतूक ट्रॉलीस पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडला. पंढरीनाथ खाडे (रा. पंढरपूर, वय 45 वर्षे) असे मयताचे नाव आहे. ते पेशाने शिक्षक आहेत असे समजते.

पंढरपूर- वेनेगाव मार्गावर गुरसाले जवळ ऊस भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उभा होती. या ट्रॉलीस मोटारसायकल ने पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत मोटारसायकल स्वार पंढरीनाथ विश्वनाथ खाडे हे जागीच ठार झाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील आणि सहकार शिरोमणीचे संचालक सुधाकर कवडे यांनी घटनास्थळी थांबून पोलीस प्रशासन व ॲम्बुलन्स यांना कळवून मदत केली. तसेच वाहतूक सुरळीत केली.

ऊस वाहतूक सुरू झाल्याने पंढरपूर तालुक्यात अपघाताची मालिका सुरू झाली आहे. रविवारी खर्डी येथे तर सोमवारी गुरसाळे येथे अपघात झाला आहे. रस्ते सुरक्षितता बाबत पोलीस, ट्रॅक्टर मालक,चालक यांनी दक्षता घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!