पंढरपूरजवळ अपघात 4 जण जागीच ठार

सर्व मृत लोक कोल्हापूर जिल्ह्यातील भाविक

याच माल ट्रक ला बोलेरो जीप ने धडक दिली.

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर – सांगोला रोडवर कासेगाव हद्दीत सातवा मैल येथे आज ( दि12 फेब्रुवारी ) सकाळी 6 वाजता भीषण अपघात झाला आहे. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची बोलेरो जीप रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रक वर आदळली.

या अपघातामध्ये जीप मधील 1 पुरुष, 2 महिला, 1 लहान मुलगी असे 4 जागीच ठार झाले आहेत. तर 1 पुरुष गंभीर जखमी असून उपचारासाठी पंढरपूर ला दाखल केले आहे .

आज सकाळी 6 वाजता कडोली ( ता.चंदगड, जि कोल्हापूर ) येथील भाविकांची बोलेरो जीप रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला धडकल्याचे समजते. मयतांची नावे अद्याप समजली नसली तरी त्यांच्या जवळ असलेल्या आधार कार्ड वरून सर्व सर्व मयत व जखमी हे चंदगड जि. कोल्हापूर येथील आहेत अशी माहिती तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.

अपघातातील इतर जखमीना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Leave a Reply

error: Content is protected !!