सांगोल्यात तिहेरी अपघात : पती – पत्नी ठार

कार, रिक्षा व दुचाकीचा अपघात

सांगोला : ईगल आय मीडिया

भरधाव इर्टिगा कार रिक्षा व दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेतमजूराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. हा अपघात काल सोमवार (दि.29 ) दुपारी ४ च्या सुमारास सांगोला – पंढरपूर रोड वरील हॉटेल चंद्रमाला जवळ घडला. ज्ञानदेव नामदेव भिसे (वय -४५) व बबिता ज्ञानदेव भिसे (वय -४० दोघेही रा. फणेपुर ता. लोहारा जि. उस्मानाबाद) असे मृत पती-पत्नीची नावे आहेत.

या अपघातात इर्टीगा कार चालक जखमी झाला असून त्याचे नाव समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस नाईक राहुल देवकते घटनास्थळी धाव घेऊन मृत व जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून सांगोला रुग्णालयात हलवले. अपघातानंतर रिक्षा चालक रिक्षा घेऊन पळून जाताना ग्रामस्थांनी बामणी ( ता. सांगोला ) गावात पकडले.

मृतांचे नातेवाईक फणेपूर (ता.लोहारा जि.उस्मानाबाद) येथून येण्यास विलंब लागल्यामुळे रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते तर अपघाताची नोंदही झाली नव्हती.

Leave a Reply

error: Content is protected !!