मुन्नाभाई संजय दत्तला फुप्पूसाचा कॅन्सर

तिसऱ्या स्टेजला आजार गेल्याचे निदान

टीम : ईगल आय मीडिया
बॉलिवूडचा मुन्नाभाई उर्फ संजय दत्त याला फुप्पूसाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. ट्रेंड अनालिस्ट कोमल नाहाटा यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. आणि संजय दत्त साठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.


बॉलिवूडचा आघाडीचा आणि नेहमीच वादग्रस्त राहिलेला
अभिनेता संजय दत्त याला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. संजय दत्त उपचार घेण्यासाठी परदेशातही जाण्याची शक्यता आहे. फिल्म ट्रेड अनालिस्ट कोमल नाहटा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र संजय दत्तला डिस्चार्ज देण्यात आला पासूम आता त्याला फुप्पूसाचा कॅन्सर झाला आहे. त्याला लवकर आराम पडो असंही नाहटा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

शनिवारी संध्याकाळी संजय दत्तला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्याला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. संजय दत्तची करोना चाचणीही झाली होती. ज्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

मी परत येईन !

‘नमस्कार मित्रांनो, काही वैद्यकीय उपचारांसाठी मी कामापासून छोटा ब्रेक घेतो आहे. माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी माझ्यासोबत असून माझ्या प्रकृतीविषयी चिंता करू नका असं आवाहन मी चाहत्यांना करतो. त्याचप्रमाणे तब्येतीविषयी काही अफवा पसरवू नका. तुमच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या आधारे मी लवकरच परत येईन’, असं ट्विट संजय दत्तने केलं आहे.


अभिनेता संजय दत्त याची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त राहिली असून मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात शस्त्रास्त्रे बाळगली म्हणून संजय दत्त शिक्षा भोगून आलेला आहे. नर्गिस आणि सुनील दत्त यांचा चिरंजीव म्हणून संजय दत्त पहिल्या पासून प्रसिद्धी च्या झोतात आणि वादग्रस्त राहिलेला आहे. आता कुठे त्याचे जीवन सुरळीत चालले होते तोवर त्याला हा आजार असल्याचे निदान झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!