मार्केट कमिटी येथून शक्ती प्रदर्शन अर्ज भरण्यास जाणार
पंढरपूर : ईगल आय न्यूज
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी कारखान्याचे माजी संचालक एड. दीपक पवार बुधवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांचे सोबत परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार उद्या अर्ज दाखल करणार आहेत.
बुधवारी विरोधी परिवर्तन पॅनलचे प्रमुख एड. दीपक पवार व त्यांचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथील पवार यांच्या कार्यालयापासून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत.
सहकार शिरोमणी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया चालू आहे. मंगळवार 75 उमेदवारांची 80 अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी, सभासद शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पवार यांनी केले आहे.