सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी गणेश पाटील

जिल्ह्यातील युवक संघटीत करण्याची जबाबदारी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष पदी स्व.राजूबापू पाटील यांचे चिरंजीव ऍड. गणेश पाटील यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी युवक चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी निवडीचे पत्र दिले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे उपस्थित होते.

आजोबा यशवंतभाऊ होते पहिले जिल्हाध्यक्ष। राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 साली झाल्यानंतर या पक्षाचे पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून ऍड. गणेश पाटील यांचे आजोबा कै. यशवंत भाऊ पाटील यांनी काम केले होते. यशवंतभाऊ पाटील हे समाजवादी काँग्रेसच्या उमेदवारी वर पंढरपूर विधानसभेची निवडणूक ही लढले होते. जिल्ह्यातील खा. पवारांचे विश्वासू म्हणून भोस्याचे पाटील घराणे ओळखले जाते. त्याच ऋणानुबंधाना आणखी मजबूत करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून या निवडीकडे जिल्ह्यातील युवकांचे लक्ष लागले होते. पंढरपूर तालुक्यातील अरुण आसबे, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे, करमाळा येथील अभिषेक आव्हाड हे प्रमुख इच्छुक होते. मात्र राजूबापू पाटील यांच्या निधनानंतर पक्षाने गणेश पाटील यांच्यावर जिल्ह्यातील युवक संघटनेची मोठी जबाबदारी दिली आहे.

ऍड.गणेश पाटील हे भोसे ग्रामपंचायत चे उपसरपंच म्हणून सध्या काम करीत आहेत. कृषिराज शुगरची ही जबाबदारी राजू बापू पाटील यांच्या पाश्चात्य गणेश पाटील यांच्याकडे आली आहे. या पार्श्वभूमीवर सत्तेत असलेल्या पक्षाच्या युवक आघाडीची जबाबदारी खांद्यावर पडल्याने या पदाला ते कसे न्याय देतात याकडे लक्ष लागले आहे.

या निवडीबद्दल ऍड. गणेश पाटील यांचे अभिनंदन होत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या.जयंत पाटील यांनीही गणेश पाटील यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

error: Content is protected !!