माढा मतदारसंघात रस्त्यांचा विकास कागदावर : ॲड मीनल साठे
भोसे : प्रतिनिधी
माढा विधानसभा मतदारसंघासाठी पंढरपूर तालुक्यातील गेल्या पंधरा वर्षापासून ही ४२ गावे जोडलेली आहेत .या भागातील गेल्या पंधरा वर्षापासून रस्त्यांचा प्रश्न कायम आहे. या रस्त्यांसाठी वेळोवेळी निधी मंजूर केला जातो, परंतु तो निधी कागदावरच खर्च केला जातो. या रस्त्याची कामे त्यांचे नातेवाईक ठेकेदार यांचेकडे दिली जातात. त्या कामाची गुणवत्ता एकदम निकृष्ट दर्जाचे असून रस्त्याची परिस्थिती पूर्वीसारखी लगेच झालेली दिसून येते, अशी टीका राष्ट्रवादीच्या उमेदवार ऍड. मिनलताई साठे यांनी केली.
माढा विधानसभा मतदारसंघातील महायुती राष्ट्रवादी काँग्रेस चे अधिकृत उमेदवार ॲड मीनल ताई साठे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील ४२ गावातील पांढरेवाडी, चिलाईवाडी, आजोती, जाधववाडी या गावातील जाहीर सभा झाल्या. या गावातील जाहीर सभांसाठी महिला व ग्रामस्थांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. यावेळी पांढरेवाडी येथील बापूसाहेब फाळके, दगडू पवार, शिवाजी लोहार, रुपाली फाळके, रियाज मुलाणी, विष्णू फाळके, सोनबा आयरे, बापूसाहेब फाळके, इ उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सौ साठे म्हणाल्या की, मी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून माढा तालुक्यातील महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण, लघुउद्योग प्रशिक्षण, फूड प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण, बचत गटातील महिलांसाठी विविध व्यवसाय प्रशिक्षण या मंडळाच्या माध्यमातून दिले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा करियर गायडन्स मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जाते. भविष्यात या मतदारसंघातील महिलाना, मुलींसाठी सर्वांगीण विकास करण्यासाठी मंडळामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत.
यावेळी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजना, महिलांना अर्ध्या तिकीट प्रवास तसेच शासनाच्या अनेक योजना विषयी माहिती मतदारांना सांगण्यात आली. मीनल साठे यांचा माढा संपूर्ण मतदारसंघांमध्ये होम टू होम महिलांची प्रभावी प्रचार यंत्रणा राबवून प्रत्यक्ष महिला मतदाराची संवाद साधल्यामुळे प्रचार प्रभावी होताना दिसत आहे.
जाधववाडी येथे आज गाव भेट प्रचार दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार ॲड.सौ.मिनलताई साठे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी दत्तात्रय शेळके, प्रदीप हजारे, सोमनाथ शेळके, सौ प्रितिका कोरडे उपस्थित होते. चिलाईवाडी येथे आज गाव भेट प्रचार दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार ॲड.सौ.मिनलताई साठे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी श्री. काकासाहेब शेळके, श्री अण्णा शेळके,श्री. भारत जमदाडे, श्री. प्रदीप सलगर, श्री प्रल्हाद गायकवाड, रूचाताई शेळके, सौ. प्रिया शेळके, सौ, प्रियांका जमदाडे उपस्थित होते. अजोती येथे आज गाव भेट प्रचार दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार ॲड.सौ.मिनलताई साठे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी राजू आरकीले, सुभाष साळुंखे, प्रशांत गुटाळ, रणजित मांढरे, मनीषा गुटाळ, विजय आरकिले माजी उपसरपंच उपस्थित होते.