सोलापूर : ईगल आय मीडिया
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी संतोष धोत्रे यांनी आज पदभार स्वीकारला .
आज जिल्हा परिषदे मघ्ये येऊन त्यांना सिईओ स्वामी यांची दालनात भेट घेऊ रूजू होत असल्याचे पत्र सादर केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी संतोष धोत्रे यांचे स्वागत केले. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, कार्यकारी अभियंता कदम प्रमुख उपस्थित होते.
नाविन्यपुर्ण योजना राबविणेवर भर देणार – अतिरिक्त सिईओ संतोष धोत्रे
सोलापूर जिल्हयात काम करीत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे मार्गदर्शन घेऊन नाविन्यपुर्ण योजना राबविणेवर भर राहिल. सर्व पदाधिकारी यांचेशी समन्वय ठेऊन कामाचे नियोजन करणेत येईल. जिल्हयात योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणेचे दृष्ट्रीने नियोजन करण्यात असून आज पासून कृषी व इतर विभांगाचा आढावा घेऊन कामास सुरूवात केली आहे.
नियमित योजना राबविताना राज्यात सोलापूर जिल्हा टाॅप वर राहिल या दृष्टीने प्रयत्न राहतील. याच बरोबर नाविण्यपुर्ण योजना राबविणेवर भर राहिल असेही त्यांनी सांगितले .