ऑक्सफर्ड विद्यापीठातून ‘आय टी’त डिग्री : 8 वर्षे देशाचे आय टी सल्लागार
टीम : ईगल आय मीडिया
अफगाणिस्तानचे माजी माहिती तंत्रज्ञान मंत्री सय्यद अहमद शाह सादत सध्या जर्मनीमध्ये पिझ्झा विकत आहेत. पिझ्झा कंपनीचा ड्रेस घालून करून ते जर्मनीच्या लाइपझिग शहरात सायकलवर पिझ्झा डिलिव्हर करत आहेत. तशा प्रकारचे फोटो ही व्हायरल झाले आहेत. सादत यांनी गेल्या वर्षीच माहिती आणि आणि तंत्रज्ञान मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या आणि राष्ट्रपती घनी यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद होते. राजीनामा दिल्यानंतर ते काही काळ देशात राहिले, परंतु नंतर जर्मनीला आले. अल जजीरा या अरबी वृत्त वाहिनीने या संदर्भात वृत्त प्रकाशित करून हा प्रकार समोर आणला आहे.
सय्यद अहमद शाह सादत यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून कम्युनिकेशन्स आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी अराम्को आणि सौदी टेलिकॉम कंपनीसाठी सौदी अरेबियासह 13 देशांमध्ये 20 पेक्षा जास्त कंपन्यांशी संवाद क्षेत्रात 23 वर्षे काम केले. त्याच्या दोन दशकांहून अधिक अनुभवात, सादतने 2005 ते 2013 पर्यंत अफगाणिस्तानच्या संवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार म्हणून काम केले. 2016 पासून 2017 पर्यंत त्यांनी लंडनमध्ये एरियाना टेलिकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले.अफगाणिस्तान IT मिनिस्टर, मंत्री असताना देशात सेलफोन नेटवर्कचा विस्तार केला होता.
अफगाणिस्तान चे आय टि मंत्री असताना सुरक्षेच्या गराड्यात असणारे सादत आता सामान्य नागरिक झाले आहेत आणि जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हर करत आहेत.अफगाणिस्तान सोडल्यानंतर सुरुवातीला सर्व काही ठीक होते, पण पैशाअभावी त्यांनी पिझ्झा डिलिव्हरी बॉय बनण्याचा निर्णय घेतला. डिलिव्हरीचे काम करण्यात कोणतीही लाज नाही, असे ते म्हणतात.
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याबरोबर ते देश सोडून जर्मनीला गेले होते. आयटी मंत्री असताना त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सेलफोन नेटवर्कला प्रोत्साहन दिले होते. आज तेच मंत्री जर्मनीत पिझ्झा डिलिव्हरी करीत आहेत,यावरून अफगाणिस्तान च्या सामान्य जनतेच्या भवितव्याबाबत चिंता अधिक वाढली आहे.