केरळमध्ये कोझिकोड येथे एअर इंडिया च्या विमानास अपघात
टीम : ईगल आय मीडिया
एअर इंडियाचं विमान (AIR INDIA Express Plane) केरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर घसरलं. सायंकाळी 8 च्या सुमारास झालेल्या या घटनेत वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. हे विमान दुबईतून केरळच्या कोझिकोड विमानतळावर हे उतरलं. या विमानात १९१ प्रवासी होते. प्राथमिक माहितीनुसार दोन्हीही पायलटसह 17 प्रवासी ठार झाले असून 123 जखमी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा करून अपघाताची माहिती घेतली व मदतीचे आश्वासन दिले. या घटनेत वैमानिकाचाही मृत्यू झाल्याचं वृत्त काही स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे. विमानाच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक संचलनालयाने या विमानात १९१ प्रवासी होत असंही स्पष्ट केलं आहे. अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले आहेत.
IX-1344 Dubai-Kozhikode Air India express Plane होतं. हे धावपट्टीवरुन घसरताच एकच हलकल्लोळ उडाला. रनवे च्या बाजूला असलेल्या दरीत विमान कोसळले आणि काय घडतंय हे कळण्याच्या आतच हा अपघात झाला. विमानात 128 पुरुष, 46 महिला आणि 10 मुलांचा समावेश आहे.
विमानातील प्रवाशांना वाचवण्यासाठी आता मदत आणि बचावकार्य पूर्ण करण्यात आलं आहे. केरळमध्ये कोझीकोड येथील करिपूर विमानतळावर हे विमान लँड करत असतानाच ही घटना घडली. ही धावपट्टी टेबल टॉप स्वरूपाची असून पुरेसा प्रकाश नसल्याने धावपट्टीवरुन हे विमान घसरलं आणि 30 फूट एका छोट्या दरीत पडलं. या घटनेत दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एक पायलट दीपक वसंत साठे हे महाराष्ट्रीयन आहेत. दरम्यान या ठिकाणी मदत आणि बचावकार्य पूर्ण करण्यात आलं आहे.