पंचनामे करायला सांगितले, भरपाईबाबत केंद्राकडे ईशारा !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे केंद्राच्या मदतीकडे बोट

पंढरीत दुर्घटना ग्रस्त घाटाची अजित पवारांनी केली पाहणी


पंढरपूर : ईगल आय मीडिया

राज्यात अभूतपूर्व पाऊस पडल्याचे मान्य करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्राच्या मदतीकडे बोट दाखवले. केंद्राने तातडीने आपले पथक पाठवावे किंवा आमच्या यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरून केंद्राने मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


उपमुख्यमंत्री अजित पवार आज पंढरपूर तालुक्याच्या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी तसेच घाटाची भिंत कोसळून मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. यावेळी पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते कै. राजूबापू पाटील, माजी आम. कै. सुधाकपंत परिचारक, हभप कै. रामदास महाराज कैकाडी यांच्याही कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.


यानंतर पत्रकारांशी पवार यांनी रस्त्यावरच उभा राहून सुमारे 20 मिनिटे संवाद साधला. अतिवृष्टी आणि महापुराने झालेल्या नुकसान भरपाईबाबत बोलताना पवार म्हणाले की, कोरोनामुळे राज्याचे उत्पन्न बंद झाले आहे. केंद्र सरकारकडे राज्याच्या जी एस टी चे पैसे थकले आहेत. राज्याची जेवढी पत आहे तेवढे कर्ज काढून एप्रिलपासून सप्टेंबर अखेर राज्य चालवले आहे. असे सांगून केंद्राने या परिस्थितीत राज्याला मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

केंद्राने नुकसानीच्या पाहणी साठी तातडीने पथक पाठवावे किंवा राज्याच्या यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत आणि मदत घ्यावी असे सांगून नुकसानभरपाई कधी दिली जाईल याला मुद्द्याला बगल दिली.
त्यामुळे पंचनामे झाले तरी नुकसानभरपाई कधी मिळेल याची मात्र त्यांनी यावेळी खात्री दिली नाही.

One thought on “पंचनामे करायला सांगितले, भरपाईबाबत केंद्राकडे ईशारा !

Leave a Reply

error: Content is protected !!