ना.अजितदादांच्या मातोश्रींची नागेश फाटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

पंढरपूर : ईगल आय न्यूज


राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मातोश्री श्रीमती आशाताई अनंतराव पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या गादेगाव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. मातोश्री अशाताई पवार या पंढरीत विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी नागेश फाटे यांच्या निवासस्थानी जावून पाहुणचार स्विकारला.


याबाबत प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी ही सदिच्छा भेट म्हणजे मी करीत असलेल्या कार्याबाबत मिळालेली शाबासकीची थाप आहे असे सांगितले. त्यामुळे आईसाहेबांनी दिलेला आशिर्वाद हा कायम स्वरूपी पाठीशी राहिल, असेही फाटे यांनी सांगितले.

यावेळी अतुल गोसावी, दत्तात्रय पवार, हणुमंत पवार, कल्याण कुसूमडे, उद्योगपती डॉ.रमेश फाटे , उमेश फाटे , तालुकाध्यक्ष उमेश सासवडकर , अशोक फाटे ,प्रकाश फाटे, गणेश बागल, शांतिनाथ बागल, सतिश बागल, प्रताप टेलर, औदुंबर माने, गणेश बागल, ओंकार फाटे, शुभम फाटे, संकेत फाटे, शशांक फाटे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!