अखेर अकलूजकर जिंकले !

अकलूज नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायत अध्यादेश निघाला

माळशिरस : ईगल आय मीडिया

अकलूज नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायत मंजूर करण्यात आल्याचा अध्यादेश आज नगरविकास विभागाच्या सचिवांनी काढला आहे. त्याचबरोबर दोन्ही नगरपालिका साठी प्रशासकांची ही नियुक्ती जाहीर केली आहे. त्यामुळे गेल्या 2 महिन्यापासून अकलूजकरांच्या सुरू असलेल्या आंदोलनास यश मिळाले आहे.

राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सर्व निकष पूर्ण असूनहीनगरविकास विभागाकडून अकलूज नगरपालिका आणि नातेपुते नगरपंचायत अध्यादेश काढला जात नव्हता.

मात्र गेल्या 2 महिन्यापासून अकलूज, नातेपुते सह माळशिरस तालुक्यातील नागरिकांनी बेमुदत आंदोलन छेडले होते. तसेच न्यायालयात ही धाव घेऊन राज्य सरकार ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले होते. न्यायालयाने राज्य सरकारला आदेश काढण्याची सूचना केली होती. त्यानुसार अकलूजकरांच्या या आंदोलनाला यश आले असून आज नगरविकास विभागाने अकलूज नगरपालिका आणि नातेपुते नगरपंचायत जाहीर केली आहे. त्यासंदर्भात अध्यादेश काढला आहे.

पुढील सर्व प्रक्रिया पार पडून लोकनियुक्त व्यवस्था स्थापित होइपर्यंत अकलूज नगरपालिकेचे प्रशासक म्हणून माळशिरस चे तहसीलदार आणि नातेपुते नगरपंचायत चे प्रशासक म्हणून पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी माळी यांच्याकडे पदभार देण्यात येत असल्याचा ही आदेश आजच काढण्यात आला आहे.

अशा प्रकारे माळशिरस तालुक्यात 1 नगरपालिका आणि 2 नगरपंचायत झाल्या आहेत.याबद्दल माळशिरस तालुक्यातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. अकलूज आणि नातेपुते च्या नागरिकांना दोन्ही शहरांचा सर्वांगीण विकास होईल अशी आशा लागली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!