आम.रणजितसिंह मोहिते – पाटील यांचा पुढाकार
टीम : ईगल आय मीडिया
अकलूज नगरपालिका, यशवंतनगर आणि संग्रामनगर ग्रामपंचायतीच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर याच्याकडे बैठक घेतली. यावेळी आ.राम सातपुते, जि.प.अध्यक्ष अनिरुध कांबळे, पं.स.उपसभापती प्रतापराव पाटील यांचेसह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थीत होते.
यावेळी माढा तालुक्यातील व्होळे येथील सिना – माढा उपसा सिंचन योजनेसाठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला शेतकर्यांना बागायती दराप्रमाणे व नवीन कायद्याप्रमाणे मिळण्यासंदर्भात आ.रणजितसिंह मोहिते – पाटील यांनी मा.जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे मागणी केली. यावेळी अजित तळेकर, प्रकाश चोपडे, कालवा बाधित शेतकरी यांचेसह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थीत होते.
अकलुज नगरपरिषदेच्या हिंदु स्मशानभुमीवर सद्या कोरोना माहामारी मुळे आसपासच्या गावातुन दहनविधीसाठी ताण वाढत आहे.या पार्श्वभुमीवर विद्युत शवदाहिनी बसवण्यात यावी. नवीन झालेल्या अकलुज नगरपरिषदेसह शेजारील यशवंतनगर, संग्रामनगर ग्रामपंचायतींचे दुषीत सांडपाणी नाल्यांतुन निरा नदीत मिसळते परिणामी नदीकाठी असलेली लोकवस्ती, शिवसृष्टी, अकलाई मंदीर येथे येनारे भाविक, पर्यटकांवर परिणाम होत असुन सदर सांडपाण्याच्या व्यवस्थापन प्रकल्पाठी शासकीय जमीन मिळावी.
उपजिल्हा रुग्णालय अकलुज येथे १०० खाटांच्या नवीन इमारत बांधकामासाठी शासकीय जमीन मिळावी अशा स्वरूपाच्या मागण्या यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडे करण्यात आल्या.