अकलूज नगरपालिका नातेपुते नगरपंचायत साठी राज्यपालांना निवेदन

अकलूजचे शिष्टमंडळ घेऊन फडणवीस राज्यपाल भवनात

टीम : ईगल आय मीडिया

अकलूज, माळेवाडी (अकलूज) या ग्रामपंचायतींचे नगरपालिकेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये रूपांतर व्हावे, या मागणीसाठी आज (दि 20 जुलै) रोजी शिष्टमंडळाने राजभवन मुंबई येथे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी अकलूज नगरपालिका आणि नातेपुते नगरपंचायत मान्यतेसाठी राज्य शासनाने अध्यादेश काढावा अशी मागणी करण्यात आली.

उच्च न्यायालयाने दिला आदेश !

अकलूज नगरपालिका आणि नातेपुते ननगरपंचायत मान्यतेसाठी गेल्या 3 आठवड्यांपासून अकलूज आणि नातेपुते येथील ग्रामस्थ आंदोलन करीत आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही राज्य शासनाने आदेध काढण्यास विलंब लावला आहे, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. या संदर्भात उच्च न्यायालयात ग्रामस्थांनी धाव घेतली असता न्यायालयाने ही राज्य सरकारने 3 आठवड्यात अध्यादेश काढण्याचे आदेश दिले आहेत.

त्याप्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आम रणजितसिंह मोहिते पाटील, भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. शिवतेजसिंह मोहिते पाटील, नातेपुते ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. अतुल पाटील, श्री. मामा पांढरे, माळेवाडी (अकलूज ) ग्रामपंचायतीचे सरपंच जालिंदर फुले हे उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!