अकलूज, नातेपुते नगर पंचायतीसाठी लाक्षणिक उपोषण

नगरपरिषदेत रूपांतर करा
पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने तहसीलला निवेदन

टीम : ईगल आय मीडिया

अकलूज – माळेवाडी व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये रूपांतर करा या मागणीसाठी अकलूज , माळेवाडी ( अ ) व नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले . तसेच या मागणीचे निवेदन तहसीलदार जगदीश पाटील यांना देण्यात आले .


या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ रणजितसिंह मोहिते पाटील, आम. राम सातपुते, सभापती शोभा साठे, उपसभापती प्रताप पाटील , माजी जि प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख , भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील , अर्जुनसिंह मोहिते पाटील, उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील , सत्यप्रभादेवी मोहिते पाटील , जि प सदस्या शीतलदेवी मोहिते पाटील , वैष्णवीदेवी मोहिते पाटील , मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे , विश्वतेजसिंह मोहिते पाटील आदी प्रमुुुख उपस्थित होते.


आ राम सातपुते म्हणाले , अकलूज , माळेवाडी ( अ ) ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर तर नातेपुतेनाकडे प्रकरण अंतीम टप्यात असल्याचे नगरविकास मंत्रालयाने १६ डिसेंबर २०२० रोजी निवडणूक आयोगास कळविले होते व ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली होती . परंतु शासनाने दुजाभाव केला . अकलूज – माळेवाडी व नातेपुते ग्रामपंचायतीवर अन्याय करण्याचे व त्यांना विकासापासून वंचीत ठेवण्याचे काम राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केले आहे .


भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले , राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाणीवपूर्वक राजकारण करीत आहे . या सरकारने २२ तारखेपर्यंत आपला निर्णय जाहीर केला नाही तर, दि २२ जून पासून अकलूज व नातेपुते येथे साखळी उपोषण करु .


तर जि प सदस्या शितलदेवी मोहिते पाटील म्हणाल्या , अकलूज गावाच्या विकासाला निधी कमी पडतो . नगरपरिषद झाली तर नागरीकांना सर्व सुविधा पुरविता येतील . त्यासाठी मी जिल्हा परिषद सदस्यत्वाचाही त्याग करायला तयार आहे असे शासनास ॲफिडेव्हिट लिहून दिले आहे .

यावेळी अकलूजच्या सरपंच पायल मोरे , नातेपुते सरपंच कांचन लांडगे , उपसरपंच अतुल पाटील , माळेवाडी ( अ ) सरपंच जालिंदर फुले , उपसरपंच अरुण खंडागळे , मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव माने शेंडगे , रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार केंगार , कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले , शिवसेनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय पवार , आण्णा कुलकर्णी , मुक्तार कोरबू , ॲड वजीर शेख यांच्यासह विविध राजकीय , सामाजिक , व्यापारी संघटना व ग्रामस्थांनी या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला .

Leave a Reply

error: Content is protected !!