टीम : ईगल आय मीडिया
अकलूज (ता.माळशिरस) येथिल सहकार महर्षी शंकरराव मोहीते – पाटील सहकारी बॕकेत २७ कोटी ०६ लाख १९ हजार ८१४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून याबाबत गोकुळ बंकटलालजी राठी (रा. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. या संदर्भात अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
गोकुळ बंकटलालजी राठी हे वैधानिक लेखा परिक्षक आहेत. बॕकेचे दप्तर तपासताना दि. ३ एप्रिल २०२१ ते २० आॕक्टोंबर २०२१ या कालावधीत मुख्य शाखा अकलूजचे जनरल मॕनेजर नितीन उघङे यांनी २४ कोटी १८ लाख २१ हजार ८१४ रुपये, टेंभुर्णी शाखा व्यवस्थापक रविंद्र पताळे यांनी ५३ लाख ८४ हजार रुपये, करमाळा शाखा व्यवस्थापक समिर दोशी यांनी १ कोटी ४० लाख ८४ हजार १६१ रुपयांचा अपहार केला आहे.
तर सोलापूर शाखा व्यवस्थापक प्रदिप उघङे यांनी ५३ लाख ३४ हजार रुपये, इंदापूर शाखा व्यवस्थापक सचिन सावंत यांनी ६ लाख ५० हजार रुपये व कोथरुङ शाखा व्यवस्थापक राहुल भिंगारदीवे यांनी ३३ लाख ४५ हजार ८०० रुपये असा एकूण २७ कोटी ०६ लाख १९ हजार ८१४ रुपयांचा अपहार संगनमताने केल्याचे आढळून आले.
त्यामुळे गोकुळ राठी यांनी वरील सर्वांच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हि केस अकलूज पोलीसांकङुन पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर यांचेकङे वर्ग करण्यात आली आहे.