पंढरपूर तालुक्यात ८ कोटी ८० लाखांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
मी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तारापूर, पोहोरगाव, फुलचिंचोली भागात आलो तेव्हा रस्त्याची अवस्था बघितली असता व या भागातील युवकांनी मतदानावर बहिष्कार घातल्याचे समजले ते योग्यच म्हणावे लागेल. कारण या भागातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. याचा विचार करून मी प्रथम सतरा गावातील रस्त्यासाठी प्राधान्य दिले. येत्या दोन वर्षाच्या काळात मुख्य रस्ते पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आ.यशवंत माने यांनी केले.
आ.यशवंत माने यांच्या प्रयत्नातुन अर्थसंकल्प (बजेट) योजनेअंतर्गत १.मगरवाडी-तारापुर-विटे-पुळुज,खरसोळी व पुळूजवाडी रस्ता ५ कोटी ७० लाख, २ खरसोळी-पोहोरगाव-टा. सिकंदर पुळूज रस्ता १ कोटी २५ लाख व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना १.फुलचिंचोली ते पाटील वस्ती पोहोरगाव १ कोटी ८५ लाख* असे एकूण ८ कोटी ८० लाख रुपये मंजुर झाले आहेत.
निधीतून रस्त्याचे भुमिपूजन आ.यशवंत(तात्या)माने,लोकनेते चेअरमन बाळराजे पाटील व जेष्ठ नेत कल्याणराव पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
पुढे बोलताना आमदार यशवंत माने म्हणालेे की, निवडणुका होऊन दीड वर्ष झाले याा दिड वर्षाच्या काळात 28 ते 30 कोटी निधी या सतरा गावात दिला असल्याचेे सांगून सोलापूर- तिर्हे मार्ग विषयी अँड.विजयकुमार नागटिळक प्रश्न उपस्थित केला असता, या रस्त्यासाठी२००कोटी रुपये लागतात, टप्पा क्र २ मध्ये हा रस्ता समाविष्ट केला असून कॅबिनेट मध्ये मंजूर झाला आहे. वारंवार अजित पवार, अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून येत्या नागपूर अधिवेशनात चार पदरी कॉक्रीटीकरण रस्ता अर्थसंकल्पात मंजूर होईल असा आशावाद यावेळी आ.माने यांनी दिला.
यावेळी विविध गांवच्या भूमिपूजन समारंभाला माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकट भालके, विनोद महाडिक,हनुमंत पवार,युवा नेते रमाकांत नाना पाटील, अस्लम चौधरी, दीपक माळी, सचिन पाटील, बाबासाहेब पाटील, नेताजी सावंत ,सुजित गायकवाड, अजिंक्य सपाटे, बिलांसिद्ध पुजारी, बिभीषण वाघ,महेश पवार,सरपंच नारायण जाधव आदीसह विविध गावचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.