19 हजार dis like तरीही अमृता फडणवीस म्हणाल्या ‘ मी पुन्हा येईन ‘

तिला जगू द्या’ या गाण्यांवर dis like चा पाऊस

टीम : ईगल आय मिडिया

अमृता फडणवीस यांच्या ‘ मला जगू द्या ‘ या गाण्यावर dis like चा पाऊस पडला असून like च्या 10 पट अधिक dis like मिळालेल्या आहेत. तसेच 3 हजारावर कॉमेंट्स आहेत आणि त्यातील 90 टक्क्यांवर कॉमेंट्स निगेटिव्ह आहेत. विशेष म्हणजे या dislike आणि निगेटिव्ह कॉमेंट्स चा विचार न करता दुसरे गीत घेऊन ‘ मी पुन्हा येईन’ अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

अमृता फडणवीस यांचे ‘ तिला जगू द्या ‘ हे मुली वाचवा अभियानावर आधारित गाणे यू ट्यूब वर प्रसारित झाले आहे. या गाण्याला 4 दिवसांत 12 लाखांवर व्युव्ह्ज मिळाले आहेत. मात्र त्यापेक्षा चर्चा आहे ती गाण्यावर आलेल्या dis like चीच.

या गाण्याला अद्याप पर्यंत 19 हजार dis like मिळाले आहेत आणि 2200 like, तसेच 3 हजारांहून अधिक कॉमेंट्स आल्या असून बहुतांशी कॉमेंट्स या टीकात्मक स्वरूपाच्या आहेत. अमृता फडणवीस यांनी गीतातून दिलेल्या मुली वाचवा संदेशाकडे दुर्लक्ष करून या गाण्यावर टीका होत आहे.

मात्र यामुळे अमृता फडणवीस नाउमेद झाल्या नाहीत तर त्यांनी टीका आणि dis like करणार्याना चोख उत्तर देत नवीन गीत घेऊन ‘मी पुन्हा येईन ‘ असे खणखणीत उत्तर दिले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!