जखमी आणि मयतांमध्ये पंढरपूर तालुक्यातील नागरिकांचा समावेश
अपघातग्रस्त मोटारसायकल आणि इनसेट मध्ये मयत युवक
पंढरपूर : ईगल आय मीडिया
सांगोला – पंढरपूर-कराड रोडवरील चिकमहूद पाटीजवळझालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघांवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मोटारसायकल व ट्रॅक्टर अशा तीन वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातातील मयत हे देवापूर (ता. म्हसवड) व पंढरपूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. अन्य दोन मयत हे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील असून त्यांची नावे अक्षय पडळकर ( वय 22 ) व भीमराव पडळकर ( वय 65 ) असल्याचे समजते.
काळजी घ्यायला हवीय 🙏🙏