खर्डी जवळ अपघात : 1 जण ठार

अनवली येथील इसमाचा अपघाती मृत्यू

पंढरपूर : ईगल आय मीडिया

खर्डी ( ता.पंढरपूर ) जवळील चौथा मैल येथे झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीताराम मारुती मेटकरी असे अपघातातील मयताचे नाव असून येथील ( ता.पंढरपूर ) येथील असल्याचे समजते.

पंढरपूर- सांगोला रोडवर खर्डी गावच्या हद्दीत चौथा मैल येथे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने मोटार सायकलला धडक दिली.

सीताराम मारुती मेटकरी रा अनवली, ता.पंढरपूर ) असे मयताचे नाव असून मेटकरी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातासंदर्भात तालुका पोलिसांत नोंद करण्याचे काम अद्याप चालू आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!