कोल्हापूर acb ची कारवाई
टीम : ईगल आय मीडिया
शहरातील जमिनीचे मूल्यांकन कमी करण्यासाठी 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून 20 लाख रुपये लाच घेताना नगर रचना अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. कोल्हापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही मोठी कारवाई केली.
कोल्हापूर येथील कसबा बावडा येथील प्रशासकीय भवनातील सहाय्यक जिल्हा निबंधक कार्यालयात शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. गणेश हनुमंत माने ( वय 45 वर्षे ) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
जमिनीचे मूल्यांकन कमी करण्यासाठी त्याने 45 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 20 लाख रुपयांची लाच घेताना ही कारवाई केली गेली. याबाबत तक्रारदाराने 22 जानेवारी रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार खातरजमा करून लाच लुचपत विभागाने सापळा लावून ही कारवाई केली.
यावेळी 19 लाख रुपये 500 रुपयांच्या तर 2 हजारांच्या नोट स्वरुपात 1 लाख रुपयांची रक्कम यावेळी हस्तगत करण्यात आली.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.