स्व.भालके यांचे जनतेशी अतूट नाते : आनंद शिंदे

पवारांनी माझ्या सारख्या कलाकारांना संधी दिली

मंगळवेढा : ईगल आय मीडिया

आ. भारत भालके या जनतेचे नाते अतूट होते, सर्वसामान्य माणूस मंत्रालयात जाऊन भारत नाना सोबत काम करू शकतो. हे मी उघड्या डोळ्यांनी मंत्रालयात पाहिले आहे. अपूर्ण राहिलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी व नानाच्या उपकाराची परतफेड करून भगीरथ भालके  यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी केले.  

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निमित्त महा विकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारा निमित्त त्यांनी मंगळवेढ्यात प्रचार सभा घेतल्या. या सभेस उमेदवार भगीरथ भालके, पी बी पाटील, राहुल शहा, ऍड. नंदकुमार पवार, अजित जगताप, तानाजी खरात, मारुती वाकडे, अशोक पाटील, मारुती मासाळ, चंद्रशेखर कोंडूभैरी, रामेश्वर मासाळ, अरुण किल्लेदार, भारत बेदरे, सरपंच संगीता रणदिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

   आनंद शिंदे यांनी शरद पवार हे सर्वसामान्यांची जाण असणारे नेते असून माझ्यासारख्या सर्वसामान्य गायकाला आमदार म्हणून विधानपरिषदेवर  शिफारस केली आहे. त्याच प्रमाणे माझ्या भूमीतील व विधानसभेचे आ स्व. भारत भालके यांचे माझे गेले अनेक वर्षापासून संबंध होते. मंत्रालयात कामानिमित्त  सातत्याने येत असत् त्यांची कामाची चिकाटी जिद्द वाखाण्याजोगी होती. मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, सामान्य लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत हीच त्यांची भूमिका होती. खरंतर ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती.  अशी भावना व्यक्त केली

Leave a Reply

error: Content is protected !!