घरनिकी, देगाव, मल्लेवाडी, ढवळस, धर्मगाव, शरदनगर मध्ये सभा
पंढरपूर : प्रतिनिधी
केवळ पाणी प्रश्नावरच या मतदारसंघाची निवडणूक लढवली जाते. मात्र त्या पुढे जाऊन आपण रोजगाराची मोठी केंद्रे, शिक्षणसंस्था, उद्योगधंदे उभारण्याचे काम केले निश्चितपणे केले जाईल, त्यामुळे आपणास मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन अनिल सावंत यांनी केले. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांचा मंगळवेढा तालुक्यात प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. सावंत यांनी तालुक्यातील देगाव, घरनिकी, मल्लेवाडी, ढवळस, गुंजेगाव, शरदनगर,धर्मगाव आदी गावात घेतलेल्या प्रचार सभांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे मंगळवेढा तालुक्यात अनिल सावंत यांनी प्रचारात मुसंडी मारल्याचे दिसते.
रविवारी अनिल सावंत यांनी घरनिंकी’ या गावाला गाव भेट दिली. छत्रपती शिवराय आणि मारुतीराया यांचे दर्शन घेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधला आणि ग्रामस्थांनी मांडलेल्या विकासकामांच्या समस्या जाणून घेतल्या.
आगामी काळात गावामध्ये पायाभूत सुविधांसह मोठमोठे उद्योग, शिक्षण संस्था उभारण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ करण्याचे आवाहन केले. यानंतर ‘देगांव’ या गावाला गाव भेट दिली. देगांव गावाचे ग्रामदैवत मायक्काचे दर्शन घेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्नाटक राज्याचे प्रदेशाध्यक्ष सीएस इनामदार उपस्थित होते.
या प्रचार सभावेळी विविध पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करत, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला जाहीर पाठिंबा दिला. मंगळवेढा तालुक्यातील ‘ढवळस’ मध्ये ग्रामदैवत जोतिबाचे दर्शन करून ग्रामस्थांशी संवाद साधला.यावेळी सरपंच सुनीता ताई मोरे, माजी सरपंच भाऊसाहेब हेंबाडे, ग्रामपंचायत सदस्य नागनाथ मस्के, आदी ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.