फुलचिंचोलीची अंजना झाली वनक्षेत्रपाल अधिकारी !

2 वर्षानी लागला निकाल : झाली स्वप्नपूर्ती

पंढरपूर : ईगल आय मीडिया

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या वनक्षेत्रपाल परिक्षेचा निकाल जाहीर झाला २९ सप्टेंबर २०२१ रोजी लागला असून या फुलचिंचोली (ता.पंढरपूर ) येथील कु.अंजना अशोक बनसोडे हिची (Range Forest officer.)Class2 वनक्षेत्रपाल अधिकारी वर्ग 2 पदी निवड झाली. तिने अथक प्रयत्नातुन तिने पोस्ट मिळवेली आहे. परिक्षा २०१९ झाली तरीही २ वर्ष झाली निकाल लागला नव्हता , शेवटी अखेर २९ सप्टेंबर रोजी निकाल लागला यात तिवनक्षेञपाल पदी निवड झाली.

अगदी सर्व सामान्य कुटूंबातील ही कन्या असून,कुटूंबात वारसाने कोणीही उच्च शिक्षित नाही,आई वडिलांनी आठवडे बाजार करून, गावात फिरून पालेभाजी विक्री करत,आपल्या मुलांना शिकविले. अंजनाचे शिक्षण इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत जि.प.प्राथ शाळा फुलचिंचोली शाळेत झाले, प्राथमिक शाळेत असतानाचे तिने ४ थी स्काँलरशीप,७ वी स्काँलरशीप,नवोदय इत्यादी परिक्षेत नावलौकिक केले होते. माध्यमिक शिक्षण राजीव गांधी विद्यालय येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण नवोदय विद्यालय पोखरापूर येथे झाले.पुढे तिने बी टेक करून स्पर्धा परीक्षेची तयारी केली.

गतवर्षीच सातारा जिल्ह्यात तलाठी यापदी निवड झाली होती, ग्रामीण भागातील अशिक्षित आई वडिलांनी लेकीसाठी विश्वास दाखवून शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले हे सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायक ठरेल. या संपूर्ण वाटचालीत वनक्षेत्रपाल अधिकारी विद्या अवधुतराव (जळगाव), किरण जमदाडे (तहसीलदार, जत), जि .प. शाळेचे शिक्षक नानासो साळुंखे, ज्ञानेश्वर खुणे, विजय लोंढे यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळाले. अंजनाच्या निवडी बद्दल तिचे व तिच्या कुटूंबाचे कौतुक होत आहे फुलचिंचोली गावात ग्रामस्थानकडुन जल्लोष करण्यात आला.

Leave a Reply

error: Content is protected !!